वातकुक्कुटाविषयी थोडेसे..


वातकुक्कुट – हवामानशास्त्राची ओळख मराठीतून..
Vatkukkut – Meteorology in Marathi..

नमस्कार वाचकहो,

हवामानशास्त्राची ओळख मराठीतून करून देण्याचा हा प्रयत्न तुम्हा वाचकांना आवडला असेल अशी आशा करते. गेल्या काही वर्षांमध्ये मनोगत.कॉम ह्या संकेतस्थळावर मी हवामानशास्त्रांतर्गत येणाया विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख लिहिले. काही विषय माझ्या आवडीचे, तर काही इतरांनी सुचवलेले. हे लेख एकत्रित स्वरूपात ठेवता यावेत म्हणून हा अनुदिनी (ब्लॉग) प्रपंच. ह्या अनुदिनीचे यथावकाश संकेतस्थळामध्ये रुपांतर करण्याचा मानस मी बाळगून आहे.

ह्या अनुदिनीवर तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल वाचायला आवडेल ते मला जरूर कळवा. मी त्या विषयाची माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

-वरदा वैद्य.

___________________________________________________________

चंद्राची निर्मिती

चंद्राची निर्मिती कशी झाली, त्यासाठी मांडले गेलेले तर्क व त्यांची ग्राह्याग्रह्यता यांचे विवचन करणारा ताजा लेख –

चंद्रसंभवाची कहाणी‎

____________________________________________________________

पृथ्वीचे “पाणी”ग्रहण

पृथ्वीवर पाणी कसे व कुठून आले ह्याची माहिती देणारा रंजक लेख –

पृथ्वीचे “पाणी”ग्रहण

_____________________________________________________________

एन्सो – एल निन्यो व ला निन्या

प्रशांत महासागरातील एल निन्यो व ला निन्या घटना का व कश्या घडतात व त्यांचे जागतोक परिणाम सांगणारा लेख –

मनस्वी प्रशांत – एल निन्यो व ला निन्या

______________________________________________________________

भूपट्ट विवर्तन –

पृथ्वीवर भूपट्ट विवर्तन (अर्थात plate tectonics) कसे होते, का होते हे सांगणारा व भूपट्ट विवर्तनाचे महत्त्व विशद करणारा लेख वाचा –

भूपट्ट विवर्तन – माहिती आणि महती

______________________________________________________________

त्सुनामी –

त्सुनामी म्हणजे काय? ती का, कशी आणि केव्हा तयार होते? त्सुनामीच्या धोक्याची सूचना देणा-या यंत्रणेचे कार्य कसे चालते, त्सुनामी प्रारूप (मॉडेल) म्हणजे काय असते? ह्या आणि अशा प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात मिळवण्यासाठी वाचा तीन भागांची लेखमाला-

भाग १- या गो दरियाचा दरारा मोठा‎
भाग २- कवा पान्यावरी उठतानं डोंगर लाटा‎
भाग ३- जाती पान्यानं भिजून धर्ती
_____________________________________________________________

विद्युत्पात

आकाशात चमकणारी आणि कडाडणारी वीज खरोखरीच वीज असते का? ती कशी निर्माण होते? वीज पडते म्हणजे नक्की काय होते? वीज पडताना कोणत्या क्रिया नेमक्या कोणत्या क्रमाने घडतात? हे जाणून घेण्यासाठी वाचा चार भागांची लेखमाला –

भाग १- आभाळ वाजलं धडाऽडधूम‎
भाग २- वारा सुटला सू सू सूऽम‎
भाग ३- वीज चमकली चक् चक् चक्
भाग ४- जिकडे तिकडे लख् लख् लख्‎

_______________________________________________________

वातावरणातील अभिसरण

वातावरणातील अभिसरण हेच हवामानकारक असते, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरू नये. हलणा-या हवेला वारा म्हणतात हे सामान्यज्ञान म्हणजेही अभिसरण समजावून घेण्यातली पहिली पायरीच. वातावरणातील अभिसरण कसे होते? ते स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक श्रेणीमध्ये कशाप्रकारे कार्यरत असते? वातावरणातील अभिसरणाचे मानवाचे ज्ञान आजच्या स्थितीला येताना दरम्यान कोणकोणते महत्त्वाचे टप्पे पार पडले? कोणकोणत्या गणितज्ञ, भूगोलतज्ञ आणि शास्त्रज्ञांचा ह्यामध्ये सिंहाचा वाटा होता? हे जाणून घेण्यासाठी वाचा सात भागांची लेखमाला –

भाग १- प्रस्तावना‎
भाग २- प्राचीन काळातील वाराविचार‎
भाग ३- मध्ययुगीन अभिसरणविचार
भाग ४- १५वे ते १८वे शतक
भाग ५- १९व्या शतकातील प्रगती
भाग ६- विसाव्या शतकातील गरूडझेप – पूर्वार्ध
भाग ७- विसाव्या शतकातील गरूडझेप – उत्तरार्ध ‎

_________________________________________________________

चंद्राचे महत्त्व

पृथ्वीच्या हवामानावर चंद्राचा मोठा प्रभाव आहे, होता आणि असणार आहे. पृथ्वीच्या हवामानाच्या बाबतीत असलेले चंद्राचे महत्त्व विशद करणारी लेखमाला पाच भागांमध्ये वाचा.
भाग १- चंद्र नसता तर..
भाग २- मिलॅंकोविच सिद्धांत
भाग ३- ऊर्जा संकल्प आणि पृथ्वीप्रकाश
भाग ४- भरती-ओहोटी आणि इतर चांद्रगोष्टी
भाग ५- भविष्य

5 Responses to वातकुक्कुटाविषयी थोडेसे..

  1. छान माहिती आहे तुमच्या लेखांत ..असाच लिहत रहा

  2. Sunil Tambe says:

    मॉन्सूनवर सविस्तर माहिती द्यावी, ही विनंती.
    सुनील

  3. Jet streams, cyclones , hurricanes kase tayaar hotaat v tyacha indian monsoon var kasa parinaam hoto … He plz saangave

  4. विजय पाटील says:

    वरदाताई आपला ब्लोग खूपच चांगला आहे.वाचायला आवडेल असे खूप काही आहे.विद्यार्थ्यांसाठी तर खूप वाचण्यासारखे आहे,ताई चंद्राच्या बाबतीतले लेख अभ्यासपूर्ण आहेत.मला एक शंका आहे.कि चंद्रावर मानवाने खरोखर पाउल ठेवले होते का ?जर हो तर इतक्या वर्षानंतर मानवाने पुंन्हा प्रयत्न का केला नाही.कारण आता तर त्या वेळेपेक्षा विज्ञान खूप प्रगत झाले .

यावर आपले मत नोंदवा