मी..
मी वरदा वैद्य.
सध्या वास्तव्य – अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
हवामानशास्त्र आणि खगोलशास्त्र हे माझ्या आवडीचे विषय. हवामान आणि वातावरण ह्या विषयातील विविध गोष्टी मराठीतून सांगण्यासाठी वातकुक्कुट ही अनुदिनी सुरू केली आहे. खगोलशास्त्रविषयक लेख हे विवस्वान ह्या अनुदिनीवर ठेवले आहेत.
वरदाजी,
आपली चावडी पाहून आनंद वाटला.
— तात्या.
वरदा,
तुझी अनुदिनी स्वच्छ व सुंदर आहे. पाहून मन प्रसन्न झाले. मी शासनाच्या सेवेतुन निवृत्त झालो. १० वर्षे झाली. मी अनुदिनी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यावर सभासदांची अनुसुची टाकली आहे. सभासदाची माहिती शोधण्याकरता कोड पाहिजे. बर दिलेली अनुदिनी पाहुन पाठवता आला तर पहावे. मी व सर्व सभासद ऋणी राहु.
http://www.marathishabda.com/shabda/?page_id=292
उत्कृष्ठ प्रयत्न…
Dear Varda,
Thanks for giving details about global warming and weather.
This is a gods work you don.
Thanks
Chandak
पिंगबॅक 2010 in review | वातकुक्कुट Vatkukkut
khagolshastravishayi chi mahatwapurn mahiti marathitun dilyane ticha aaswad ghyayala pratyekala aawadel.niwantpane ya kattyawar yewun dyanrypi dudhacha cup ghyawa ase mahatwa ya maleche aahe. mi aapale manapasun abhinandan karato w pudhil watchalis shubhechha deto. DHANYAWAD/
This is really interesting n good work…
Prachi
तुमच्या अनुदिनी विषयी आजच कळले. मला विज्ञान या विषयात मला खूप रस आहे आणि मी Discovary चे सर्व कार्यक्रम पहतो. आणि माझ्या मुलाला हि (९ वर्षे) ते आवडते. दुर्दैवाने माझे शिक्षण काही जास्त झाले नाही . आणि या विषया ची सरळ सोपी माहिती कोणी मुद्दामहून सांगणारही नाही. पण आता हि अनुदिनी रोज वाचन करेन.
धन्यवाद
प्रमोद
मनोगत वरील आपले जवळपास सगळे लेख वाचले. आवडले.
मनोगत वरील आपल्या नव्या लिखाणाच्या प्रतीक्षेत !
-भू,क.
श्री. वरदाजी; आपली वातकुक्कुट ही अनुदिनी फार आवडली. अनेक इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द पहिल्यांदाच मिळाले. आपले हार्दिक आभार. एखादा लेख सूर्य/चंद्र ग्रहणावरही प्रसिद्ध करावा ही विनंती.
नमस्कार,
माझी अनुदिनी तुम्हाला आवडल्याचे वाचून आनंद वाटला. उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चंद्र-सूर्य ग्रहणांवर लेख लवकरात लवकर लिहिण्याचा प्रयत्न मी करीन.
1) सूर्य किंवा चंद्र ग्रहण लागण्यापूर्वी आणि नंतर जो काळ असतो त्याला काय म्हणतात?
2) लिली कोलीस्को यांचे “Agriculture of tomorrow” हे पुस्तक वाचताना एक गोष्टीकडे ध्यान गेले “चंद्राच्या वेग-वेगळ्या कलांमद्धे त्याचा पृथ्वीवरील प्रभाव वेग-वेगळा असतो” प्रश्न असा आहे… पृथ्वीवरून आपल्याला चंद्रकला दिसतात; दिसतो तेवढ्या भागावर सूर्य प्रकाश असतो; मात्र पूर्ण चंद्र तेथे असतो; असे असताना कालांप्रमाणे प्रभाव कां बदलतो?
Lilly Kolisko developed the Capillary Dynamolisis method (Steigbildmethode), testing the idea that not only the moon, but the other planets as well, have an influence over earthly fluids. To test this, she dissolved metals classically associated to each planet and observed the pictures left by their absorption over a filter paper. She noticed consistent differences of the patterns according to the position of the planets in relation to sun and earth. Lilly Kolisko also worked on the development of a remedy for foot and mouth disease.
Kolisko’s book “Agriculture of tomorrow” can be ordered as pdf, free of charge at:http://www.soilandhealth.org/01aglibrary/01aglibwelcome.html
तुमचा दुसरा प्रश्न रोचक आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा
चंद्राची कला कोणती आहे ह्यावर अवलंबून असण्याचे कारण नाही. मात्र चंद्र
दिवसभरात केव्या आकाशात दिसेल तो काळ आणि कला ह्यांचा संबंध आहे.
त्यामुळे चंद्र तुमच्या ठिकाणाहून दिसणार्या आकाशात केव्हा असेल हे
तिथीवरून सांगणे शक्य व्हावे. त्यामुळे चंद्राचा संपूर्ण पृथ्वीवर होणारा
परिणाम तिथीवर अवलंबून नसला तरी शेतीसाठी चंद्र शेतीवरच्या आकाशात आहे वा
पृथ्वीच्या मागच्या बाजूला आहे ह्यावर परिणाम अवलंबून असण्याची शक्यता
आहे. मात्र ठोस विधान करण्यापूर्वी मला लिली कोलिस्कोंचे पुस्तक वाचावे
लागेल. पृथ्वीवर चंद्राच्या आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो. जेव्हा चंद्र आणो सूर्य पृथ्वीसापेक्ष विरोद्ध बाजूंना असतात तेव्हा येणारी भरती ते एकाच बाजूला असताना येणा-या भरतीच्या तुलनेत कमी तीव्रतेची असते. चंद्राची कला ही चंद्र आणि सूर्याची पृथ्वीसापेक्ष स्थिती दर्शवते. त्यामुळे चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या एकत्रित परिणामाचेही निर्देशन चंद्राच्या कलेतून मिळते असे म्हणता यावे.
माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्या बद्दल आपले आभार. लिली कोलिस्कोंचे यांचे पुस्तक माहितीपूर्ण आहे. विषयावर त्यांनी सातत्याने २० वर्षांच्या वर संशोधन केलेले आहे. अगदी मृत्यू दिना पर्यंत त्यांची निरीक्षणे चालू होती बायो डायनॅमिक शेती पद्धतीत त्यांच्या माहितीचा उपयोग करतात. ईतर शेतीतही तो व्हायला हरकत नाही. सेंद्रिय शेतीवरील माझी लेखमाला पुण्याच्या अॅग्रो-वन मद्धे प्रसिद्ध झालेली आहे. हा लेख मी मागे ठेवला होता. भूगोल माझा आवडता विषय असायचा; खगोल वर मात्र जास्त लक्ष नव्हते; म्हणून संभ्रम होता. आपल्या संगतीने तो आता दूर होईल से वाटते. पुढील वर्षी बहुधा माझे २ भागातील पुस्तक “अशी शेती तशी शेती” प्रसिद्ध होईल; त्यात हा लेख असेल. २१ नोव्हेंबरला मी मुंबईत आहे; वर्षभर भारतात असेन. आपण भारतात आलात तर निश्चित कळवा.
माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्या बद्दल आपले आभार. लिली कोलिस्कोंचेयांचे पुस्तक माहितीपूर्ण आहे. विषयावर त्यांनी सातत्याने २० वर्षांच्या वर संशोधन केलेले आहे. अगदी मृत्यू दिना पर्यंत त्यांची निरीक्षणे चालू होती. बायो-डायनॅमिक शेती पद्धतीत त्यांच्या माहितीचा उपयोग करतात. ईतर शेतीतही तो व्हायला हरकत नाही. सेंद्रिय शेतीवरील माझी लेखमाला पुण्याच्या अॅग्रो-वन मद्धे प्रसिद्ध झालेली आहे. हा लेख मी मागे ठेवला होता. भूगोल माझा आवडता विषय असायचा; खगोल वर मात्र जास्त लक्ष नव्हते; म्हणून संभ्रम होता. आपल्या संगतीने तो आता दूर होईल से वाटते. पुढील वर्षी बहुधा माझे २ भागातील पुस्तक”अशी शेती तशी शेती” प्रसिद्ध होईल; त्यात हा लेख असेल. २१ नोव्हेंबरला मी मुंबईत आहे; वर्षभर भारतात असेन. आपण भारतात आलात तर निश्चित कळवा.
Please get in touch danielreuben311@yahoo.com
I have sent you an email. – Varada
I was in India for very long time; since could not contact you.
Hope by now you have read “Lily Kolisko’s book – Agriculture of Tomorrow”.
Hope you are now in position to shade some light on my previous question.
By the way; I did not receive your mail
Warm regards
Daniel
Today is world weather day…
Happy world weather day.
Blog is very interesting and informative.
माझा ब्लॉग वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Awaiting answer to my question
Daniel
दुर्दैवाने लिली कोलिस्कोंचे पुस्तक मला उपलब्ध होऊ शकले नाही. इथल्या ग्रंथालयात ते सापडले नाही, आणि अजून विकत घेतलेले नाही. तुमच्या प्रश्नाचा पाठपुरावा करू शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व. तुम्हाला इमेल पाठवली आहे.
Awaiting answer to my question
नमस्कार,
मी, रवींद्र दंतकाळे (उपसंपादक, दै. तरुण भारत, सोलापूर)
प्रथम आपणास शुभेच्छा देतो की, आपण सुंदररीत्या या वेबसाईटची निर्मिती केली. माझी आपणास विनंती आहे की, आपण जे लेख आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत, ते लेख आमच्या दै. तरुण भारत सोलापूरमधील दर शुक्रवारी प्रसिद्ध होणार्या विविधा या पुरवणीसाठी आपल्या नावासहित प्रसिद्ध केली तर चालेल का ?
कृपया आपणाकडून सहकार्याची अपेक्षा. आपल्याकडून अपेक्षित उत्तराच्या प्रतिक्षेत…
रवींद्र दंतकाळे
उपसंपादक दै. तरुण भारत,
सोलापूर ८८८८ ४५ १८५७ / ७३८ ७० ६० ८०० (व्हॉटस्अप)
नमस्कार,
माझी अनुदिनी तुम्हाला आवडल्याचे वाचून आनंद वाटला. इमेलने उत्तर पाठवले आहे.
धन्यवाद,
वरदा वैद्य
Dear Madam,
Your blog is very informative. Really thanks. I like it very much.
Nothing to say more.
Shivraj
dhanyavaad!
अतिशय उत्तम संकल्पना आहे. अभिनंदन ! मी गेले काही वर्षे मराठीतून माहिती प्रसाराच्या क्षेत्रात आहे. काही संकल्पना आपल्याशी Share करायच्या आहेत. आपला इ-मेल मिळाल्यास संपर्क साधता येईल.
धन्यवाद. माझा इमेल पत्ता vacube@gmail.com आहे.