पारिभाषिक संज्ञा सूची

पारिभाषिक संज्ञा सूची

मराठी शब्द

इंग्रजी प्रतिशब्द

अधिक माहिती

              अ

अद्भुत विद्युत्पात

sprite lightning

ढगांच्या वरच्या भागाकडून आयनावरणाच्या दिशेने होणा-या विद्युत्पातास अद्भुत विद्युत्पात असे म्हणतात.

अतिशीत जल

supercooled water

शून्य अंश सेल्सियस तापमानापेक्षा कमी तापमान असतानाही द्रवावस्थेत असणा-या पाण्यास अतिशीत जल असे म्हणतात.

अभिसरण

circulation

अवाहक

non-conductor / insulator

अशनी

meteor

अवकाशातील एखादी वस्तू, दगड पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये सापडल्यामुळे पृथ्वीकडे खेचली जाते. ह्या दगडाने पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला की हवेबरोबरच्या घर्षणाने तो हवेत पेट घेतो. जर हा दगड छोटा असेल तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडण्यापूर्वी, वातावरणातच जळून जातो, ज्याला उल्का असे म्हणतात. मात्र हा दगड मोठा असेल तर ज्याचा काही भाग वातावरणात जळून गेला तरी उर्वरित भाग जमिनीवर पडतो, त्याला अशनी असे म्हणतात. लोणारसारखी विवरे ही अशनीपाताने तयार झालेली आहेत.

अक्षवृत्त

latitude

अक्षवृत्तीय

latitudinal / zonal

              आ

आयनावरण

ionosphere

आयनीभवन

ionization

आयाम

amplitude

आंतर्मेघीय विद्युत्पात

inter-cloud lightning

दोन ढगांमधील विरुद्ध प्रभारित विभागांदरम्यान विप्रभारण झाल्यास त्यास आंतर्मेघीय विद्युत्पात असे म्हणतात.

आदिग्रह

protoplanet

अनेक ग्रहाणु एकत्र येऊन तयार झालेले वायूंचे वस्तुमान जे स्वत:भोवती फिरत असते आणि ज्यामध्ये ग्रहास निर्माण करण्याची क्षमता असते.

              उ

उचल

uplift

उथळ पाण्यातील लाटा

shallow water waves

उद्रेक

erruption

उभा छेद

vertical section

उष्ण वा उन्हाळी विद्युत्पात

heat or summer lightning

उष्णकटिबंध

tropics

पृथ्वीवरील कर्कवृत्त (साडेतेवीस अंश दक्षिण) ते मकरवृत्त (साडेतेवीस अंश उत्तर) ह्यादरम्यानच्या प्रदेशास उष्णकटिबंध म्हणातात.

              ऊ

ऊर्जागळती

energy leak

ऊर्ध्वगामी वारा

convective wind

ऊर्ध्वोधर

vertical

              ऋ

ऋण

negative

ऋतू

season

              अं

अंतर्मेघ विद्युत्पात

intra-cloud lightning

एकाच मेघातील धन व ऋण प्रभारित विभागांदरम्यान विप्रभारण झाल्यास त्यास अंतर्मेघ वा मेघांतर्गत विद्युत्पात असे म्हणतात.

              क

कृत्रिम उपग्रह

artificial satellite

              ख

खचणे

subsidence

खोल पाण्यातील लाटा

deep water waves

खंडीय हालचाल

continental drift

              ग

गर्जनाकारी मेघ

thundercloud

गोठण

condensation

गुणधर्म

characteristics

गुणोत्तर

ratio

गुरुत्वाकर्षण

gravitational attraction

प्रत्येक पदार्थ त्याच्या वस्तुमानाच्या प्रमाणात इतर पदार्थांस आकर्षित करतो. ह्या आकर्षणबलास त्या पदार्थाचे गुरुत्वाकर्षण असे म्हणतात.

गुरुत्वाकर्षणजन्य लाटा

tidal waves

सूर्य व चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राच्या पाण्यावर उठणा-या लाटांना गुरुत्वाकर्षणजन्य लाटा असे म्हणतात. भरतीच्या लाटा ह्या गुरुत्वाकर्षणजन्य लाटा असतात.

गुरुत्वीय त्वरण

gravitational acceleration

गोलक विद्युत्पात

ball lightning

विद्युत विप्रभारणामुळे लाल, केशरी वा पिवळ्या रंगाचे विजेचे तेज:पुंज गोलक हवेत तरंगताना दिसल्यास त्यास गोलक विद्युत्पात असे म्हणतात.

              ज

‘ज’ व ‘क’ दर्शक

J & K leaders

जमा होणे

deposition

ज्वालामुखी

volcano

               त

तरंगलांबी

wavelength

तरंग वा लाटेच्या लागोपाठच्या दोन शिखर वा द-यांमधील अंतरास त्या लाटेची तरंगलांबी असे म्हणतात.

त्वरण

acceleration

विस्थापनाच्या दरास त्वरण असे म्हणतात.

तापमान

temperature

एखाद्या पदार्थातील उष्णतेचे प्र्रमाण म्हणजे त्या पदार्थाचे तापमान.

तापमापक

thermometer

तापमान मोजण्याचे उपकरण.

त्सुनामी प्रारूप

tsunami model

त्सुनामीच्या धोक्याची सूचना देणारी यंत्रणा

tsunami warning system

              द

दरी

trough

दर्शकबाण

dart leader

दाबमापक

hygrometer

दुभंग विभव

breakdown potential

दूरस्थ

distant

दूरक्षेत्र

farfield / remote

              ध

धक्कालहर

shockwave

धन

positive

धननिर्झर

travelling spark

धोका-सूचना केंद्र

warning-centers

              न

निकटक्ष्रेत्र

nearfield / local

निरीक्षण स्थानके

monitoring stations

नीलझोत

blue jets

              प

परस्पर-संबंध / सहकार-संबंध

correlation

पृष्ठ विद्युत्पात

sheet lightning

पुन:प्रभारण

recharge

पूर-प्रारूप

flood-model

प्रवासी ठिणगी

travelling spark

प्रशांत महासागर

Pacific Ocean

प्रातिनिधिक दर्शक

pilot leader / step leader

प्रारूप

model

              फ

फीत विद्युत्पात

ribbon lightning

              ब

बाष्प

moisture

वायू स्वरूपातील पाण्याला वा पाण्याच्या वाफेला बाष्प असे म्हणतात.

बाष्पसंपृक्त

moisture-saturated

विशिष्ट तापमानाला हवा जेवढे बाष्प सामावून घेऊ शकते त्यापेक्षा जास्त बाष्प हवेत असल्यास त्या हवेला/ढगाला बाष्पसंपृक्त हवा/ढग असे म्हणतात.

              भ

भू्कवच

crust

भूकंप

earthquake

भूकंप तीव्रता

magnitude of earthquake

भूकंपप्रवण

seismically active

भूकंप-प्रवर्तित

earthquake-induced

भूकंप-प्रारूप

earthquake-model

भूकंप लहरी

seismic waves

भूपट्ट

tectonic plates

भूस्खलन

landslide

भौतिक गुणधर्म

physical properties

भौतिक घटना

physical composition

               म

मणी विद्युत्पात

beads lightning

मापनश्रेणी

scale

मूक-भूकंप

silent earthquake

मेघकण

cloud droplets

मेघांतर्गत विद्युत्पात

intra-cloud lightning

एकाच मेघातील धन व ऋण प्रभारित विभागांदरम्यान विप्रभारण झाल्यास त्यास अंतर्मेघ वा मेघांतर्गत विद्युत्पात असे म्हणतात.

              ल

लाटेचे भौतिकशास्त्र

physics of waves

              व

वर्गमूळ

square root

वर्णपट

spectrum

वर्णपटीय

spectral

वहनमार्ग

conducting path

व्यस्त प्रमाण

inverse proportion

व्यापारी वारे

trade winds

उष्णकटिबंधीय प्रदेशात विषुववृत्ताच्या दिशेने वाहणारे पृष्ठीय वारे. प्राचीन काळी व्यापारासाठी होत असलेल्या नौकानयनासाठी ह्या वा-यांची दिशा विचारात घेऊन प्रवास होत असे. त्यामुळे ह्या वा-यांना व्यापारी वारे असे नाव पडले. व्यापारी वारे हा वातावरणातील सामान्य अभिसरणाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

वातावरण

atmosphere

भूपृष्ठाला गुरुत्वशक्तीमुळे धरून राहिलेले, वास व रंग विरहित असलेले व वायू, बाष्प आणि धूलीकण ह्यांनी बनलेले प्रवाही आवरण म्हणजे वातावरण.

वातावरणीय विद्युत

atmospheric electricity

वातावरणातील अस्थिरता

atmospheric instability

वातावरणातील विचलन

atmospheric disturbance

वाराजन्य

wind generated

विदा3

data

विद्युतदांडा/विद्युतदांडी

lightning rod

विद्युतधारा

current

विद्युतभारित/विद्युतप्रभारित

electrically charged

विद्युतरोधन

electrical insulating

विद्युतवाहक

electric conductor

विद्युतीकरण

electrification

विप्रभार

discharge

विभव

potential

बिंदूच्या ठिकाणी असणा-या विद्युत पातळीला विभव असे म्हणतात.

विभवांतर

potential difference

विद्युत प्रभाराच्या स्थानांतरणासाठी आवश्यक असलेल्या विद्युत पातळीतील फरकाला विभवांतर असे म्हणतात.

विरूपण

deformation

विरूपण-प्रारूप

deformation-model

विषुववृत्त

equator

पृथ्वीवरील पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या अक्षास काटकोन करून असलेले काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर व दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते.

विषुववृत्तीय

equatorial

विस्थापन

displacement

वैद्युत दुभंग

electrical break-down

वर्षाव

precipitation

विद्युतक्षेत्र

electric field

विद्युतधारेच्या वहनामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रास विद्युतक्षेत्र असे म्हणतात.

वेधशाळा

observatory

              श

शाखा विद्युत्पात

fork lightning

विद्युत विप्रभारणाचे वेळी वहनमार्गास अनेक फाटे फुटल्यास त्यास शाखा विद्युत्पात असे म्हणतात.

शिखर

crest

              स

सक्रिय

active

सम प्रमाण

direct proportion

समस्थानिक

isotope

समुद्रतळ

ocean floor

समुद्रतळाची रचना / उंचसखलपणा

topography of ocean floor

साखळी परिणाम

chain reaction

सुरुवातीची माहिती

initial conditions

स्थानिक

local

सेंद्रीय

organic

स्थैतिक विद्युत

static electricity

स्फटिकी

crystalline

रेणूंच्या विशिष्ट आणि स्थिर मांडणीमुळे तयार झालेल्या रचनेस स्फटिकी रचना असे म्हणतात.

सूक्ष्मसेकंद

microseconds

एका सेकंदाचे दशलक्ष भाग केल्यास त्यातील एक भाग म्हणजे सूक्ष्मसेकंद.

सौरकण

solar particles

सूर्याकडून येणारे ऊर्जायुक्त कण ज्यांत प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि जड आयनांचा समावेश होतो.

सौर तेजोमेघ

solar nebula

सूर्य आणि सूर्यमाला ज्या तेजोमेघापासून तयार झाले तो तेजोमेघ (वायू व धुळीचा प्रचंड ढग).

संमिश्र धातू

alloys

दोन वा अधिक धातूंचे मिश्रण, ज्यातून घटक धातू सहजी वेगळे करता येत नाहीत. संमित्र धातूंचे गुणधर्म त्यातील घटक धातूंच्या गुणधर्मांहून भिन्न असतात. उदाहरणार्थ – पितळ, स्टील.

संवेग

momentum

संवृद्धी

accretion

भोवतालचे कण गुरुत्वाकर्षणाने स्वत:त सामावून घेऊन गाभ्याच्या वाढण्याच्या प्रक्रियेला संवृद्धी असे म्हणतात

सांख्यिकी शक्याशक्यता

statistical probability

              ह

हवामान प्रारूप

climate model

हवामानाची गणिती प्रतिकृती म्हणजे हवामान प्रारूप.

हवामान फुगे

weather baloons

वातावरणाच्या वरच्या स्तरातील घटकांचा अभ्यास करण्याची उपकरणे असलेले फुगे. हे फुगे जसजसे वर जातात तसतशी त्या त्या स्तरातील वातावरणीय घटकांची (जसे तापमान, दाब इत्यादी) नोंद ह्या फुग्यांमधील उपकरणांमध्ये केली जाते.

हिमगर्भ

ice nuclei

हिंदी महासागर

Indian Ocean

              क्ष

क्षितिजसमांतर

horizontal

क्षेत्रफळ

area

संदर्भ – विज्ञान १: इयत्ता १०वी क्रमिक पुस्तक, १९९४, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व अपर शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य.

संदर्भ – प्राकृतिक भूविज्ञान, २००४, अ. वि. भागवत आणि डॉ. श्रीकांत कार्लेकर, रघुनाथ पब्लिशिंग हाऊस.

शैलेश खांडेकर ह्यांची विदग्ध ही अनुदिनी.

पारिभाषिक संज्ञा – प्रस्तावना

परिभाषा आणि पारिभाषिक संज्ञा 

प्रत्येक विषयाची स्वत:ची अशी एक परिभाषा असते. त्या परिभाषेमध्ये विशिष्ट शब्दांचे विशिष्ट अर्थ असतात. हे अर्थ नेहमीच्या भाषेशी बरेचदा सुसंगतच असले तरी त्या विषयांच्या दृष्टीकोणातून एक नेमका अर्थ, एक नेमकी संज्ञा एखाद्या शब्दाला प्राप्त होते, तेव्हा ती परिभाषा होते. शास्त्रीय विषयांवर लेखन करताना परिभाषा वापरणे महत्त्वाचे आणि गरजेचेही असते. इथे लिहिलेल्या लेखांमध्ये अशा पारिभाषिक संज्ञा वारंवार वापरलेल्या आहेत, आणि भविष्यातही वापरल्या जातील.

काही संज्ञा ह्या प्रचलित आहेत, तर काही (प्रचलित नसल्यामुळे) तयार केल्या आहेत. मराठीतून विज्ञानाचा प्रसार होण्याकरता ह्या संज्ञा नक्कीच उपयोगी पडतील आणि वापरात येऊन रूढ होतील अशी आशा आहे. इथे वापरलेल्या एखाद्या संज्ञेसाठी एखादी प्रचलित संज्ञा असेल तर ती मला नक्की कळवा. तसेच मी तयार केलेल्या एखाद्या संज्ञेऐवजी दुसरा एखादा शब्द जास्त योग्य वाटत असेल, तर तसेही जरूर कळवा.

पारिभाषिक संज्ञा सूचीमध्ये संज्ञांचा क्रम अकारविले (अ ते ज्ञ असा बाराखडीतील स्वर आणि व्यंजनांच्या प्रचलित क्रमानुसार) आहे.

– वरदा वैद्य